Skip to main content

Posts

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्या मन
Recent posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण

गुळूंचवाडी येथील तरुणाने केली आत्महत्या

बेल्हे(वार्ताहर)   गुळूंचवाडी(ता.जुन्नर)येथील एका ४२ वर्षीय व्यक्तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.बाबाजी अर्जुन गुंजाळ(वय ४२वर्ष)असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी शुक्रवारी ( दि २६) राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही याबाबतची फिर्याद मयत बाबाजीचे लहान भाऊ दत्तात्रय अर्जुन गुंजाळ यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीवरुन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंकलेश्वर भोसले हे करीत आहेत.

ऊसाच्या फडात आढळली बिबट्याची पिल्ले

बेल्हे (वार्ताहर)मंगरुळ(ता.जुन्नर)  येथील गणेशनगर भागात ऊस तोडणी चालू असताना शुक्रवार (दि.२६) रोजी एका शेतात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली असून त्या बिबट्याच्या पिल्लांना त्यांच्या आईपर्यंत पोचवण्याची कार्यवाही वनविभागाने केली आहे.याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की मंगरुळ (ता. जुन्नर) येथील गणेशनगर भागात चिमाजी बाबुराव येवले यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना दुपारी चार वाजता दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली असता ग्रामस्थांनी सदर घटना तात्काळ वनविभागाला कळवली. या पिल्लांची माहिती मिळताच ओतूरचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार बेल्हे वनपाल आर.यू .वीर व पारगाव तर्फे आळे वनरक्षक राजू गाढवे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या पिल्लांची  डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली असता एक अडीच महिने व दुसरे नऊ महिन्याचे नर व मादी अशी दोन पिल्ले होती.  

शिक्षकांना १० कलमी कार्यक्रमाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना होणार फायदा-आशा धांबोरी,केंद्रप्रमुख

बेल्हे (वार्ताहर) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये १० कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून बेल्हे (ता.जुन्नर) केंद्रातील शिक्षकांना सोमवार (दि.२२) रोजी या बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असून या प्रशिक्षणाचे बेल्हे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजन करण्यात आले होते. या नव्या उपक्रमामुळे सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता शालेय जीवनापासूनच सुधारण्यास मदत होणार असून या १० कलमी कार्यक्रमाचे प्रारुप  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने  विकसित केले आहे.या वेळी बेल्हे केंद्रातील शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले असून या वेळी केंद्रप्रमुख आशा धांबोरी पूर्णवेळ उपस्थित होत्या तर उपस्थित सर्वांचे आभार मुख्याध्यापक अजिनाथ घुले यांनी मानले.या वेळी अनेक शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.या दहा कलमी कार्यक्रमातील घटक पुढीलप्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांसाठी माईंडफुलनेस कार्यक्रम म्हणजेच सजगता, अध्ययन स्तर निश्चिती,कृतीपुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे,इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे,सामान्य ज्ञान पुस्तकाचे विद्यार

ऊस ट्रॕक्टर ट्राॕलीला चारचाकीची मागून धडक एक ठार दोन गंभीर

बेल्हे(वार्ताहर) कल्याण-अहमदनगर महामार्गावर गुळूंचवाडी गावच्या हद्दीत उसाच्या ट्रॉलीला इनोव्हा कारने पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असून हे सर्व जण नगरकडून आळेफाटा येथे जात असताना शुक्रवारी (दि.१९) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून संजय मारुती गगे( रा.नळवणे,ता.जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की कल्याण-अहमदनगर  महामार्गावर गुळंचवाडी शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच १६ केव्ही ६४८६ ) नंबर नसलेल्या व उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जात होता,त्याच दरम्यान भरधाव वेगाने आळेफाट्याकडे जाणारी इनोव्हा चारचाकी ( एमएच-१९-एपी-८०१०)ट्रॉलीच्या पाठीमागून जाऊन धडकली व जोरदार धडक बसल्याने इनोव्हा चारचाकीचे डाव्या बाजुचे जास्त नुकसान झाले असून धडक इतकी जोराची होती की इनोव्हामधील संजय मारुती गगे जागीच ठार झाले व उर्वरित दोन जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी द

बेल्हे राष्ट्रवादी कार्याध्यक्षावर प्राणघातक हल्ला

बेल्हे(वार्ताहर) गुंजाळवाडी(ता.जुन्नर) येथे कल्याण-अहमदनगर महामार्गावरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या डोक्यात लोखंडी राॅडने मारुन जखमी केल्याप्रकरणी तिघाजणांवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी बेल्हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे (रा.बेल्हे ता.जुन्नर, जि.पुणे) हे शुक्रवारी(दि.१९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आळेफाटा येथून आपल्या दुचाकीवरुन बेल्हे गावाकडे जात असताना राजुरी गावच्या पुढे गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागून येणारे त्यांचे चुलतभाऊ साहेबराव चाटे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी राॅडने मारहाण करुन गंभीर जखमी केले असून या प्रकरणी साहेबराव धनंजय चाटे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना कल्याण-अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या मंगल कार्यालयासमोर गुंजाळवाडी गावच्या हद्दीत घडली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित पोळ हे करत आहेत.