बेल्हे(वार्ताहर) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष वसंतराव शेळके,राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊली शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व शेळके परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व गावातील सर्व प्रमुख संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रत्येकवर्षी दिवाळीच्या सणाला सर्व मुस्लिम बांधवांना बोलावून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून
राजुरी या गावाला एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक आहे व ती जपण्याचा,जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदू मुस्लिम या बांधवांना एकत्रित घेऊन या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शेळके कुटुंबियांमार्फत दरवर्षी केला जातो.
युवा नेतृत्व वल्लभ शेळके यांच्या पुढाकाराने साजरा होत असलेला दिवाळी फराळाचा कार्यक्रम म्हणजे खमंग विचारांचा खरपुस नजराणा असून खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम बांधवांचे पूर्वापारपासूनचे एकोप्याचे दर्शन घडवतो तसेच राजुरी गावच्या जडण-घडणी मध्ये शेळके परिवाराचा त्याग वाखाणण्याजोगा असल्याचे गुलाम नबी शेख म्हणाले.
समाजातील सर्वच स्तरातील विशेषतः मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन चालण्याची शेळके परिवाराची भूमिका कौतुकास्पद असल्याचे मत अकबर भाई पठाण यांनी व्यक्त केले.
माणुसकी आणि मानवता हीच आपली जात आणि धर्म आहे.राजुरी गाव सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.विचारांच्या फराळाची बैठक,सुसूत्रता,चांगल्या प्रकारची विचारधारा याचे प्रतीक म्हणजे हा कार्यक्रम असल्याचे शिवाजीराव हाडवळे म्हणाले.याप्रसंगी आभार व्यक्त करताना वल्लभ शेळके म्हणाले कि,मुस्लिम समाजाचे सर्वांशी सलोख्याचे संबंध असून राजुरी गावच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचा मोलाचा वाटा आणि ठसा असून जुन्या आठवणींना उजाळा देत चालीरीती,परंपरा,संस्कृती यांचे जतन करण्यासाठीच हा कार्यक्रम घेत असल्याचे वल्लभ शेळके यांनी सांगितले.
यावेळी समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष वसंतराव शेळके,वल्लभ शेळके,विवेक शेळके,सरपंच सौ.प्रिया हाडवळे,हाजी गुलाम नबी शेख ,पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष व संघटनमंत्री बाळासाहेब औटी,डी बी गटकळ साहेब,मच्छिन्द्र घंगाळे,अनंतराव गटकळ,तंटा मुक्ती अध्यक्ष संदीप औटी,विविध कार्यकारी सोसायटीचे सुदाम औटी,निलेश हाडवळे,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ औटी,सखाराम गाडेकर,गौरव घंगाळे,शाकिर भाई चौगुले,सचिन गटकळ,शिवाजी कदम,बाळासाहेब हाडवळे,अनिल रायकर, भिकाजी कणसे,गणेश हाडवळे,किरण जाधव,मोहन नायकवाडी,अविनाश औटी,कारभारी औटी,दैनिक सकाळ चे वार्ताहर राजेश कणसे,गंगाराम औटी,अशोक औटी,कैलास औटी,शिवाजीराव हाडवळे,योगेश माने ,मुसलमान जमात राजुरी उपाध्यक्ष जाकीरभाई पटेल,बाबाभाई पटेल,तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष जब्बारभाई इनामदार,अकबरभाई पठाण,नजीर भाई शेख,अन्सारभाई पटेल,बशीरभाई पठाण,अबुभाई पठाण,इंनूस भाई चौगुले,कादर भाई पटेल दस्तगिरभाई पठाण,मुज्जमिल भाई पठाण,अमिरभाई शेख,फिरोज भाई पटेल,कलीमभाई पटेल,जीलानीभाई पटेल,पप्पूभाई पटेल,शाहीदभाई पटेल,हारूनभाई पटेल,जीलानी जमादार व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment