बेल्हे(वार्ताहर) सुधाकर सैद
कोरोना संसर्ग व महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लग्न समारंभ, मेळावे,मोर्चे घेण्यास बंदी घातली आहे.
नवीनच भाजपध्ये प्रवेश केलेल्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या बेल्हे येथील समर्थकांनी पोलीसांची कोणतीही परवानगी नसताना मंगळवार दि.७ रोजी येथील एका मंगलकार्यालयात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन गर्दी जमविल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली असून याप्रकरणी गोरक्षनाथ हसे या पोलीस अंमलदाराने फिर्याद दिली असून
फिर्यादीनुसार संतोष देविदास तांबे तालुका प्रमुख भाजप राहणार ओतुर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, मोहन बन्सी मटाले राहणार बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे,अमोल हरिभाऊ शिंदे राहणार शिंदेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे,मयूर रोहिदास सुळे पूर्ण पत्ता माहीत नाही,ज्ञानेश्वर शांताराम शिंदे पूर्ण पत्ता माहीत नाही,शिवाजी शंकर डोंगरे पूर्ण पत्ता माहीत नाही ,रामदास मुकुंद शिंदे राहणार आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्यावर भव्य सत्कार समारंभ आयोजन करुन व गर्दी जमवून सोशल डिस्टसिंगचे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भारतीय दंड विधान १८८ व २६९ या कलमानुसार फिर्याद दाखल करण्यात आली असून या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार भोसले हे करत आहेत.
Comments
Post a Comment