Skip to main content

बेल्हे(सुधाकर सैद) समता गणेश मंडळामुळेच समता,बंधुता आणि एकता टिकून-श्री.सखाराम गाडेकर,अध्यक्ष समता गणेश मंडळ,राजुरी(इंदिरानगर)

बेल्हे(सुधाकर सैद)   समता गणेश मंडळामुळेच समता,बंधुता आणि एकता टिकून-श्री.सखाराम गाडेकर,अध्यक्ष समता गणेश मंडळ,राजुरी(इंदिरानगर)
समता गणेश मंडळ राजुरी इंदिरानगर येथील गणेश मंडळ या वर्षी ३० व्या वर्षात पदार्पण करत आहे.कोरोना जन्य परिस्थितीत शासनाचे सर्व नियम पाळून सुरक्षित अंतर तसेच सॅनिटायझर चा वापर करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
सन १९९२ साली सर्वांनी एकत्र येऊन समता गणेश मंडळाची स्थापना केली.नावाप्रमाणेच समतेचा संदेश देणाऱ्या या मंडळामध्ये सर्वच जाती,धर्माचे,पंथाचे लोक त्याचप्रमाणे बाराबलुतेदार एकत्रितपणे दरवर्षी श्री गणेशाची मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूजा अर्चा करतात.दरवर्षी सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,नैसर्गिक,राजकीय,उपदेशपर,लोककलेवर आधारित,पारंपरिक,लोकजागृतीपर विषयावर आधारित असे नवनवीन देखावे हे मंडळ साकारण्याचा प्रयत्न करते.
यापूर्वीही नेहरू युवा केंद्र पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विघ्नहर्त्या गणरायाचे मनोभावे पूजन करताना सामाजिक जाणिवांचे भान बाळगणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सपट चहा व दैनिक गावकरी या वृत्तसमूहाने समता गणेश मंडळ राजुरी यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले होते.
मंडळाची स्थापना झाली तेव्हा १९९२ च्या काळात गणेशाची मूर्ती ही एक पोत्याच्या शेडमध्येच बसविली जात होती.
सन २०११ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी,माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊलीशेठ शेळके,माजी उपसरपंच एम डी घंगाळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सभापती जयंत रघतवान यांच्या निधीतून मंडळासाठी समाजमंदिर बांधण्यात आले.त्यासाठी भगवान औटी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
स्थापनेपासून ते आजपर्यंत गरुड,डायनासोर,नारळ गडवा, हनुमान,पर्णकुटी,ससा,मिनी जहाज,बदक,डोंगर,मोर अशा अनेक कलाकृतींनी युक्त असे देखावे सादर केलेले आहेत.
सन १९९८ मध्ये मंडळ नोंदणीकृत करण्यात आले.माजी सभापती दिपक शेठ औटी यांच्या प्रयत्नातून भजनी साहित्य,सतरंज्या व स्पीकर सेट यांचे वितरण करण्यात आले होते.
तसेच या पूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहल ताई वल्लभ शेळके यांच्या प्रयत्नातून मंडळाला पारंपरिक वाद्य ढोल व ताशांचे वितरण करण्यात आलेले होते.*
*गेल्या वर्षी मा.आमदार शरद दादा सोनवणे यांच्या दातृत्वातून स्वखर्चाने गणपतीचे शेड उभारण्यासाठी २.५ लक्ष रु.चा निधी मंजूर होऊन काम पूर्ण देखील झालेले आहे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सभामंडपसाठी फरशी देखील बसवून देण्यात आलेली आहे.दरवर्षी येथील भाविक या गणेशाला इप्सित कार्य पार पडण्यासाठी नवस करतात व हा गणेश नवसाला पावतो.मनात भाव शुद्ध असेल तर गणपती शुभ फळ देतो अशी याची ख्याती आहे.
मंडळाच्या या यशस्वी वाटचालीत अध्यक्ष सखाराम गाडेकर,उपाध्यक्ष सिताराम जेडगुले,सचिव भगवान औटी,खजिनदार दिनेश बनकर,सुखदेव पवार,ज्ञानेश्वर गाडेकर,सुरेश गायकवाड,शिवाजी आल्हाट,अनिल बनकर,मनोहर गुळवे,प्रदीप गाडेकर,रविराज गाडगे,ऋषिकेश पवार,नामदेव पवार,राहुल कडलाक,अक्षय शिरतर,सोमनाथ शिरतर,रोहन पवार,रोहित पवार,अनिकेत गुळवे,अभिषेक गुळवे,मयूर चव्हाण,प्रसाद गोसावी,हेमंत गोसावी,अतुल गोरे,आकाश गुळवे,आदेश गुळवे,तेजस गायकवाड,मंगेश गायकवाड,सचिन भालेराव,निलेश गाडेकर,गणेश गाडेकर,मंगेश गाडेकर,विजू गुळवे,विशाल जेडगुले,स्वप्नील जेडगुले,करण औटी,दर्शन मंडले,प्रसाद माकरे, अभिषेक चव्हाण,प्रतीक रायकर,बबलू बनकर,अक्षय गाडेकर,अजय गाडेकर,प्रकाश गाडेकर,साहिल बनकर,दत्तात्रय जाधव,ज्ञानेश्वर जाधव या सर्व तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा आहे.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...