बेल्हे(सुधाकर सैद) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकताच १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली.संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी जुन्नर तालुका शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष प्रा.एच पी नरसुडे सर,राज्यस्तरीय पुरस्कार विजेते श्री.रामभाऊ सातपुते सर,रोकडेश्वर विद्यालय अंबिदुमाला चे मुख्याध्यापक नानासाहेब झावरे सर,समर्थ बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे डॉ.सुभाष कुंभार,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,गुरुकुल चे प्राचार्य डॉ.सतीश कुऱ्हे आदी उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एच पी नरसुडे म्हणाले की यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे.शारीरीक क्षमता हा बौद्धिक क्षमतेचा पाया आहे.त्यासाठी नियमित व्यायाम,योगा केला पाहिजे.मैदानी खेळ खेळले पाहिजेत.विद्यार्थ्यांनी जिद्द,मेहनत,चिकाटी व सातत्यपूर्ण सर्व केला तर यश मिळतेच असे यावेळी एच पी नरसुडे म्हणाले.
रामभाऊ सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पहा आणि सतत कष्टाची तयारी ठेवा असा संदेश दिला.यावेळी विज्ञान व वाणिज्य शाखेतील अर्चना पानसरे,वैष्णवी गाडगे,साक्षी बनकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.समर्थ कॉलेज च्या शिक्षकांनी आम्हाला परिपूर्ण बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली तसेच अभ्यासक्रमाबरोबरच करियर मार्गदर्शन केले आणि त्याचा फायदा भविष्यातील वाटचालीसाठी होईल असे आपल्या मनोगतात सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा.संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले,प्रा.विनोद चौधरी,प्रा.सुरेखा पटाडे यांनी परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली ताई आहेर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भूषण बोऱ्हाडे ,प्रास्ताविक प्रा.राजीव सावंत यांनी तर आभार प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मानले.
Comments
Post a Comment