बेल्हे(जुन्नरवार्ता)सुधाकर सैद- समर्थ संकुलात भारतातील प्रख्यात स्थापत्य अभियंता भारतरत्न सर डॉ.विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांचा जन्मदिन 'इंजिनियर्स डे' म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सर डॉ.मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे तसेच संकुलातील सर्व विभागप्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेबिनारसाठी ऑनलाईन सहभागी झाले होते.
गुजरात मधील जिल्ह्याचे कलेक्टर रवींद्र खताळ यांचे इंजिनिअर्स डे निमित्त ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
सर्वसामान्य कुटुंबातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी घेऊन महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत आय ए एस अधिकारी म्हणून गुजरात येथे कार्यरत असणारे रवींद्र खताळ यांनी यावेळी आपला जीवनपट सर्वांसमोर कथन केला.विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधताना रवींद्र खताळ म्हणाले की,मी स्वतः एक इंजिनिअर आहे.इंजिनिअरच्या कामामध्ये लवचिकता,प्रत्येक गोष्ट जुळवून घेण्याची क्षमता व कला,ऐनवेळचे व्यवस्थापन इ बाबी अंतर्भूत असतात.आय ए एस अधिकारी होण्याआधी रवींद्र खताळ हे एका खाजगी कंपनीत काम करत होते.परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, त्यादृष्टीने प्रयत्न केला आणि विचार केला की धोका पत्करून पाहू.परीक्षा पास होऊ शकतो असा आत्मविश्वास आल्यानंतर कंपनीमध्ये राजीनामा दिला.या क्षेत्रात प्रत्येक दिवस वेगळा,विषय वेगळा,समस्या वेगळा आणि आव्हानात्मक असतो.विद्यार्थी दशेत असताना विशेषकरून इंजिनिअरिंग अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतले पाहिजे.सामाजिक भान असले पाहिजे.वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजेत.त्यासाठी अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा.ही सर्व खासियत मुळातच इंजिनिअर मध्ये असते,गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि कठोर परिश्रमाची.फावल्या वेळेत आपण काय करतो यावर भविष्यातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
अविरत परिश्रम,कडक शिस्त,कामावर निष्ठा यातून यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतरत्न सर डॉ.मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या असे उद्गार यावेळी रवींद्र खताळ यांनी काढले.मन,मेंदू आणि मनगट या तिन्हींचा चांगला मेळ घालून तरुणातील कौशल्य विकसित झाली पाहिजे.यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले.
ऑनलाईन वेबिनारचे नियोजन प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी तर डॉ.अनिल पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment