बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद ) जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गावात महास्वच्छता अभियानास सुरुवात झाली असून बेल्हे गावातही त्याचा शुभारंभ झाला असून यावेळी ग्रामपंचायत परिसर,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,बसस्थानक,मंदिरांचा परिसर,मस्जिद,शाळा-महाविद्यालये,सार्वजनिक शौचालये, कचराकुंड्या यासह संपूर्ण बेल्हे गावात हे महास्वच्छता अभियान राबविले गेले त्यास नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला तसेच यावेळी प्लॕस्टिकचा कचरा रस्त्यावर न टाकण्याचेही आवाहन करण्यात आले.या अभियानात सरपंच गोरक्षनाथ वाघ,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बेंद्रे,ग्रामपंचायत सदस्य राकेश डोळस,बबन औटी,सदस्या लिलावती बोरचटे,निकीता भुजबळ,रंजना पिंगट व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.प्रदूषण व रोगमुक्त माझा गाव व्हावा
या हेतूने व जिल्हा परिषद व पंचायत समिती जुन्नर यांच्या सहकार्याने या महास्वच्छता अभियानास सुरुवात झाली असून प्रत्येक नागरिकाने आपापले घर व परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनास सहकार्य करावे व यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment