बेल्हे(वार्ताहर) येथील १०४वर्षे जुन्या असलेल्या बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ बोरचटे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व शासन परीपत्रकानुसार आॕनलाईन पार पडली.यावेळी सर्वच्या सर्व ठरावांना सभासदांनी एकमुखाने आॕनलाईन पाठींबा दिला.संस्थेने १८,३७,७४,७७३ रुपयांचे पीक कर्ज व मध्यम मुदत कर्जाचे वाटप केले असून अहवाल सालात संस्थेला २६,११,४१० रुपये इतका नफा झाला असून सभासदांना १५% लाभांश जाहीर केल्याचे अध्यक्ष बोरचटे यांनी सांगितले,तसेच संस्थेच्या कर्मचारी व संचालक मंडळाने केलेल्या कर्जवसुलीच्या कामाबद्दल सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी झालेल्या आॕनलाईन चर्चेत भाग घेताना देवीदास मटाले,बबन गुंजाळ, कैलास आरोटे यांनी कर्ज भरना करताना सभासदांना व्याज आकारण्यात येऊ नये अशी सुचना मांडली व तसा ठराव करावा असे सुचविले.या आॕनलाईन सभेसाठी बन्सी डावखर, अशोक गुंजाळ,जयवंत घोडके,अरुण बांगर,लहु गुंजाळ,सुभाष भुजबळ, काशिनाथ गुंजाळ,चंद्रकांत गुंजाळ,किसन गुंजाळ, सावकार पिंगट,सचिव बाळासाहेब गुंजाळ या संचालकांसह सुरेश बोरचटे,रामदास गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ,सुरेश भुजबळ,निलेश औटी,विलास गुंजाळ व ईतरही अनेक सभासदांनी आॕनलाईन सभेत सहभाग
घेतला शेवटी संस्थेचे संचालक जयवंत घोडके यांनी पुणे जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी,कर्मचारी व सर्व सभासदांचे आॕनलाईन आभार मानले.
Comments
Post a Comment