नैतिक मुल्ये जोपासून समतेचा संदेश देणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे एक कर्मयोगीच-वल्लभ शेळके
(बेल्हे-जुन्नरवार्ता सुधाकर सैद) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची शिदोरी आणि कार्याबद्दल माहिती देताना प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले की स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीद समजून बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष उभा करणारे
कर्मवीर हे समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले.ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.असे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण' संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे,वंचित आणि सर्वच घटकातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे,निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे यासाठी प्रयत्न केला.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे हि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे,तर समता,बंधुता, श्रमप्रतिष्ठा,सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
नैतिक मूल्ये जोपासून समतेचा संदेश देणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे एक कर्मयोगी असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
आभार प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मानले.
Comments
Post a Comment