बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) भूतदया करा,प्राणीमात्रावर प्रेम करा अशी वाक्ये वाचायला फार आवडतात पण याचा प्रत्यक्ष अनुभव बेल्हे येथील वीजवितरणचे कर्मचारी वीजबील थकबाकी वसुलीसाठी गुळूंचवाडी(ता.जुन्नर)येथील ठाकरदरा येथे जात असताना त्यांना आला.सुरेश गुंजाळ व त्यांचे सहकारी दुचाकीवरुन जात असताना अचानक एका वीजेच्या खांबावरुन एक माकड वीजेचा जोरदार झटका बसून खाली पडले व बेशुद्ध झाले त्यावेळी त्याला कर्मचारी सुरेश गुंजाळ यांनी प्रथमोपचार करताना जवळजवळ १०मिनिटे त्याच्या ह्रदयावर दाब देऊन त्याला जगविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या प्रयत्नाला यश आले व माकडाने हालचाल करण्यास सुरुवात केली.या त्यांच्या प्रयत्नामुळे एका मुक्या प्राण्याला जीवदान मिळाले असून पाणी पिल्यानंतर सदर माकडाने धुम ठोकली व जंगलात पसार झाले.सुरेश गुंजाळ यांनी भूतदया व प्रसंगावधान दाखवून जे प्रयत्न केले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment