बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी आळेफाटा पोलिसांनी आपल्या हद्दीतील राजुरी व बेल्हा येथे शुक्रवारी पथसंचलन केले. गणेशोत्सव सध्या सर्वत्र उत्साहात सुरू असून हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (१७ सप्टेंबर) राजुरी व बेल्हा येथे पथसंचलन करण्यात आले.यामध्ये पोलिस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते.गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांचे आदेशान्वये १४ जणांना तडीपार करण्यात आले आहे तसेच पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी कृत्य नोंद असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेले नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी केले आहे.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment