Skip to main content

भाजपप्रवेशामुळे जुन्नरची समीकरणे बदलणार ???

बेल्हे(वार्ताहर)  सुधाकर सैद    जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी काही दिवसांपूर्वी केलेला भाजपप्रवेश व त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बेल्हे येथे घेतलेला सत्कार समारंभ व भव्य    कार्यकर्ता मेळावा हा जुन्नरच्या दोन्हीही म्हणजे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पुढाऱ्यांना विचारात टाकणारा असून तालुक्यातील शिवसेनेचे बुरुज ढासळत चालल्याने त्याचा परिणाम भविष्यात होणाऱ्या निवडणुकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले २० वर्षे दिवंगत राजाभाऊ गुंजाळ यांनी बेल्हे गावात एकहाती सत्ता ताब्यात ठेवल्यानंतर शिवसैनिकांना एकत्र बांधून ठेवील असा नेता पूर्व भागात कोणीही दिसत नसल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते मुलूखमैदान तोफ तसेच येणाऱ्या प्रत्येकाला भाऊ,ताई व आई म्हणून जवळीक साधणा-या आशाताईंकडे वळू लागले असतानाचे चित्र मंगळवारच्या मेळाव्यातून स्पष्ट झाले.मागच्या ५ वर्षांत शिवजन्मभूमि जुन्नर तालुका शिवसेनेकडे असतानाही आमदारांना शिवसैनिकांची एकजुट करता आली नाही आणि प्रत्येकाला गृहीत धरल्यामुळे जुन्नर तालुक्यावर असणारी शिवसेनेची पकड ढिली झाल्याचे चित्र समोर आले आहे़, राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढलेले असतानाच शिवसेनेची पीछेहाट झाली़ कारण अपक्ष लढूनही आशाताई बुचके यांनी घेतलेले ब-यापैकी मतदान व त्यामुळे झालेला शिवसेना उमेदवाराचा पराभव त्यानंतर बुचके यांनी केलेला जुन्नर तालुक्याचा कार्यकर्ता चाचपणी दौरा व चर्चा त्यातून घेतलेला भाजप प्रवेश निर्णयाचा भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर त्याचे परिणाम दिसून येतील आणि आज तर त्यांच्यावर राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपची छत्रछाया असल्याने येणाऱ्या निवडणुकीत काही वेगळे चित्र दिसले तर त्यात आश्चर्य वाटणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे़, तसेच बेल्हे व परिसरात भाजपचे हाताच्या बोटावर मोजता येणारे कार्यकर्ते असताना व महिलांचीही लक्षणीय उपस्थिती जाणवल्याने आयोजकांचा उत्साह वाढला असून या सत्कार व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजक अमोल शिंदे,मोहन मटाले व किशोर तांबे यांनी येणाऱ्या सर्व निवडणूका या आशाताईंच्या नेतृत्वाखाली व भाजपच्या झेंड्याखाली लढणार असल्याचे जाहीर केल्याने भविष्यात वेगळीच रंगत येणार आहे.तशातच राज्यात महाविकास आघाडीचे सकार असल्याने येणाऱ्या निवडणुकात आघाडी होणार का बिघाडी ??? तसेच जुन्नरची जागा वाटपात कोणाकडे जाणार यावरही बरेच अवलंबून आहे,त्यामुळे शिवसेनेने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा आगामी काळात शिवसेनेचे प्राबल्य शिवजन्मभूमित आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...