बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद ) येथील जयजवान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने आपली २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या आदेशानुसार संस्था कार्यालयात आॕनलाईन पद्धतीने संस्थापक अध्यक्ष जयवंत घोडके यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.विषयपत्रिकेवरील सर्वच्या सर्व म्हणजे १३ विषयांवर आॕनलाईन चर्चा करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष घोडके यांनी संस्थेचा लेखा-जोखा मांडताना संस्थेकडे ३१ मार्च २०२१ अखेर ७ कोटी ५१ लाखांच्या ठेवी,५ कोटी ५७लाखांचे कर्जवाटप,३ कोटी ५३ लाखांची गुंतवणूक केली असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात १४,५०,१२० रुपयांचा नफा झाला असून सभासदांना १५% लाभांश जाहीर केला आहे तसेच सवंग प्रसिद्धीसाठी सवलतीच्या योजना जाहीर न करता सहकार खात्याच्या कायद्यानुसार सभासदांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील असेही घोडके यांनी सांगितले.या आॕनलाईन वार्षिक सभेसाठी प्रभाकर गुंजाळ,दत्तात्रय भुजबळ,अरुण बांगर, सावकार गुंजाळ,जितेंद्र गुंजाळ,विजय गुंजाळ,विठ्ठल गुंजाळ,अशोक खोमणे,पोपट संभेराव,संध्या काने,राजाराम डावखर या संचालकांसह दशरथ औटी,ज्येष्ठ पत्रकार देवीदास मटाले,ॲड.सूर्यकांत काने,जितेंद्र गुंजाळ,विजय गुंजाळ,कुमार ढुमणे,कविता गुंजाळ,लता डावखर या व ईतरही अनेक सभासदांनी आपल्या घरुनच किंवा मुंबई,पुणे येथूनच आॕनलाईन सभेत भाग घेऊन एक नवीनच व वेगळा अनुभव घेतला असून या सर्व आॕनलाईन सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुंजाळ यांनी केले.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment