Skip to main content

बेल्हे मेळाव्यात पडळकरांचा घणाघात

 बेल्हे(वार्ताहर सुधाकर सैद )  राज्यात दुधाला दर नाही,बैलगाडा शर्यती चालु होत नाहीत,शेतक-यांच्या मालाला भाव नाही,जनावरांचे बाजार बंद आहेत.तसेच पैसे खाणे हे एकमेव ज्यांचे काम आहे.हे नेते मुंबईत  ऐश आरामात बसतात.जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी महाराष्ट्र सरकारमधील बलात्कारी,भ्रष्टाचारी, जातीयवादी मंत्र्यांना व  हे सरकार निर्माण करणा-यांना टकमक टोकवरुन कडेलोट केला असता असा हल्लाबोल बेल्हा(ता.जुन्नर)येथे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
        जुन्नर येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांनी नुकताच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला,याच निमित्ताने सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेच्या बालेकिल्यात येथील जिल्हा परिषद गटाच्या वतीने भाजपच्या सभेचे व सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.बेल्हा येथे झालेल्या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाआघाडीच्या सरकारवर निशाणा साधत अनेक आरोप केले. यासोबत शरद पवारांवर वारंवार टीका करण्या मागचं कारणंही त्यांनी सांगितलं.२ वर्ष झाले एसटी कामगारांना पगार नाही.तरी एसटी कामगारांच्या संघटनेने मोर्चा पुकारला नाही. देवेंद्र सरकारच्या काळात यांनी २-३ वेळा संप केला.कारण या पवारांना मानणाऱ्या संघटना आहेत आणि या संघटना पवारांच्या घरी पाणी भरतात असा आरोप पडळकरांनी केला.यांच्या डोक्यात एकच आहे पैसे ओढा,पैसे खा,हे सगळं गणित यांचं आहे.जुन्नरच्या शरद पवारांच्या सभेत महिलांची उपस्थिती नगण्य होती त्यावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. या गोष्टीची आठवण करुत देत आजच्या सभेला महिलांची मोठी गर्दी होती म्हणून पडळकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी महिलांना सन्मान देणारी पार्टी म्हणून गर्दी झाली.५० वर्षांत सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते.मात्र तरीही पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते सांगतात की,आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत,कष्टक-यांचे नेते आहोत,मात्र ज्या बारामती विधानसभा मतदार संघात यांनी निवडणूक लढवली त्या मतदार संघातल्या ४४ गावात शेतीला पाणी नाही,पिण्याला पाणी नाही तीच अवस्था जुन्नर तालुक्याच्या आणे-पठार भागाची आहे. ज्या तालुक्यात ५/५ धरणे आहेत त्या तालुक्यातील जनता आज पाण्यासाठी उपाशी आहोत. याच्यापेक्षा मोठं पाप या पवार कुटुंबियांचं कोणतच असू शकत नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो.जर तुमच्या घरात ५० वर्ष सत्ता असेल तर या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. राज्यात दुधाला दर नाही, बैलगाडा शर्यत चालू होतं नाही, जनावरांचे बाजार दोन-दोन वर्षे बंद आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाहीत आणि ऐशमध्ये मुंबईत एसीमध्ये बसतात.जर छपत्रती शिवाजी महाराज आज असते आणि या महाराष्ट्रात सरकारमधील बलात्कारी,भ्रष्टाचारी, जातीयवादी मंत्र्यांना आणि हे सरकार निर्माण करणाऱ्यांना टकमक टोकावरून यांचा कडेलोट केला असता असं म्हणत पडळकरांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.आपल्याला आवाहन करण्यासाठी आलोय ते यासाठी की आपल्या आजोबांनी,पणजोबांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नादाला लागू नका.भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तुम्ही या कारण भाजप ही तरूणांसाठी काम करते,राष्ट्रहितासाठी काम करते, भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे ती नेत्यांची पार्टी नाहीये.या देशात जेवढ्या प्रादेशिक पार्ट्या आहेत.या घराणेशाही जपणाऱ्या पार्ट्या असून पंडित नेहरू,राजीव गांधी,सोनिया  गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी असे अध्यक्ष आहेत.१९९८ पासून त्यांनी अध्यक्ष बदला नाही. पण भाजपमध्ये अनेक अध्यक्ष बदलले.राष्ट्रवादीनेही अजून अध्यक्ष बदलला नाही.त्यांना एकच अध्यक्ष,आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विसर्जित करण्याची वेळ आली आहे मग कधी अध्यक्ष बदलणार असा सवाल पडळकर यांनी केला. महाराष्ट्र लुटायला मिळतंय तशी ही पार्टी.ही पार्टी उद्या बँकेसारखी विलीन होणार आहे.एसटी बस पॅसेंजरने पॅक झाल्यावर जस लटकत यावं लागते तसं तुम्हाला भाजपमध्ये यावं लागेल असा टोमणा सुद्धा पडळकरांनी लगावला.बैलगाडा शर्यत सुरू झाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे म्हणत बैलगाडा मालकांच्या भावनाशी सरकार खेळत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घोषणा केली की बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे माघारी घेणार मात्र ८ दिवस होऊनही अद्याप एकही पोलीस स्टेशनला पत्र किंवा आदेश आले नाहीत.दिलीप वळसे पाटलांना प्रश्न करत पडळकर म्हणाले की, सांगलीत शेतकऱ्यांना आरोपी म्हणून पोलीस स्टेशनला का बसवलं.राजकारण म्हणून नाही तर मी सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बोलतोय. मी संघर्ष करायला तयार आहे. सांगलीतल्या बैलगाडा स्पर्धा होऊ नये म्हणून आमच्यावर लक्ष ठेवायला पोलीस का लावले? असा सवाल करत या स्पर्धा होऊ नये म्हणून सगळे कामाला लागले होते असंही पडळकर म्हणाले. बैलगाड्याच नाव घेत आम्ही इथे मत मागायला आलो नाही असं सांगत शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनाही पडळकर यांनी लक्ष केले भाजपचा प्रत्येक नेता बैलगाडी शर्यत सुरू होण्यासाठी तुमच्या सोबत आहे असं म्हणत बैलगाडा काय मालिकेत शूटिंग करायची नाही तर प्रत्यक्षात सुरू करायची गोष्ट आहे, बिचाऱ्या अमोल कोल्हेची पवारांनी फार वाईट अवस्था केली अशी टिपण्णी पडळकरांनी केली. पवारांच्या पार्टीत २०१९ च्या अगोदर कोणी उभं राहायला माणूस नव्हता म्हणून यांनी मालिकेतला गडी आणला आणि शिवस्वराज्य यात्रेचा प्रमुख बनवला आणि राज्यभर फिरवला पण अमोल कोल्हेच्या लक्षात आलं नाही की पवारांना आता गिऱ्हाईक नाही म्हणून तुम्हाला फिरवलं.गृहमंत्री वळसे पाटलांना पडळकरांनी असा सल्ला दिला की सरकार आल्यावर पवारांनी त्यांचा गुण दाखवायचा तोच दाखवला. पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं मात्र पुतण्याने ५ वर्षात भाजपा विरोधात वाच्यता सुद्धा केली नाही कारण त्यांना तुरुंग दिसत होता.सरकार आल्यावर अनिल देशमुख सारखा माणूस शोधून आणला पवारांनी त्याला गृहमंत्री केला जो चिल्लर स्वत: खाईल आणि नोटा बारामतीला पोहोच करील म्हणून दिलीप वळसे पाटलांना माझा सल्ला आहे.सावध राहून काम करा कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाटचाल तुरुंगाच्या दिशेने सुरू आहे.यावेळी जिल्हा प्रमुख गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके,अतुल देशमुख,जयसिंग एरंडे,संतोष तांबे,संगिता वाघ, दिलीप गांजाळे,अर्चना माळवतकर,अमोल शिंदे, महेंद्र सदाकाळ,सुनंदा गाडगे,ताराचंद को-हाळे, डाॅ.दत्ता खोमणे,मोहन मटाले,संतोष खैरे,ॠषीकेश डुंबरे,शंकर शिंदे, किशोर तांबे,राजु आहेर,आशिष माळवतकर,बाळासाहेब दाते,मुक्ता दाते व विविध ठिकाणाहुन आलेले असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...