बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील ब्राह्मणआळी भागातील गेली काही वर्षे बंद असलेल्या दुमजली घराचा पुढील भाग रविवारी रात्री ११वाजण्याच्या दरम्यान अचानक कोसळला असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र बाजूच्या घराचे नुकसान झाले आहे.कै.मोहनलाल गांधी यांची ब्राह्मणआळी भागातील दुमजली इमारत असून ही इमारत जवळपास ७०/८० वर्षापूर्वी बांधलेली होती असे रायचंद गांधी यांनी सांगितले व सध्या या इमारतीत कोणीही राहत नसून गांधी कुटुंब आळेफाटा येथे राहात असल्याने सुदैवाने जिवीत हानी झाली नाही मात्र या इमारतीच्या लगत राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका मिनाक्षी लोंढे या त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर राहात असून त्यांच्या घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारतीचा विटा-मातीचा ढिगारा लोंढे यांच्या ओट्यावर पडल्याने त्यांचा जाण्या-येण्याचा रस्ता बंद झाला आहे.यावेळी भूकंपासारखा मोठा आवाज होऊन घर कोसळल्याने आजुबाजूच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचा भितीने काळजाचा ठोकाच चुकला होता असे येथे राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शाकीरा बेपारी यांनी सांगितले. यामुळे घटनेमुळे गावातील जुन्या इमारतींच्या सर्वेक्षणाची गरज निर्माण झाली असून एखादी अप्रिय घटना घडण्याअगोदरच ग्रामपंचायतीने वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment