बेल्हे (जुन्नरवार्ता सुधाकर सैद) पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे बेल्हे गावात डासांचा उपद्रव वाढला असून वातावारणात बदल झाल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणी जाण्यासाठी असणाऱ्या गटारी तुंबल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून गावामध्ये ठिकठिकाणी रिकाम्या जागांवर गवत वाढले असून याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्याने बेल्हेचे सरपंच गोट्याभाऊ वाघ यांनी सोमवार (दि.११) पासून संपूर्ण गावात धुरळणी यंत्राद्वारे औषध फवारणी चालू केली आहे. यावेळी बाजारतळ,एसटी बसस्थानक,प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक स्वच्छतागृहे,पेठआळी,चांदणी चौक,मारुती मंदीर चौक,मुस्लिम मोहल्ला यासर्व ठिकाणी नागरिकांच्या मागणी नुसार टप्याटप्याने ग्रामपंचायत कर्मचारी धुर फवारणी करत आहेत.तसेच ग्रामस्थांनीही आपल्या परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील कचरा उघड्यावर टाकू नये व कचरा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतच टाकावा असेही आवाहन सरपंच यांनी केले.

Comments
Post a Comment