Skip to main content

डाॕ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस-वाचन प्रेरणा दिन


बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)  समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात १५ ऑक्टोबर डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,प्रा.प्रवीण सातपुते,प्रा.अमोल खतोडे,प्रा.निर्मल कोठारी,प्रा.भूषण बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
ग्रंथालयातील पुस्तके,साहित्य,वाड्मय यांचे ऑनलाईन प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यावेळी डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले की विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षी असणे गरजेचे आहे.एक वेळ अपयश आले तरी चालेल.वाचनाची आवड हि सवड काढून जोपासावी लागते.व्यायाम हे शरीर आणि मेंदू दोन्हींचा मेळ घालून प्रगल्भता मिळवण्याचे साधन आहे.वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करणेसाठी वाचन हे महत्वाचे आहेच.वाचनाने आकलन शक्ती,धारणक्षमता आदींमध्ये वाढ होते.
वाचनासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांना त्यांचे इप्सित ध्येयपूर्तीसाठी मदत करणे हा या वाचन प्रेरणा दिनाचा हेतू असल्याचे डॉ.अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
कुशाग्र बुद्धिमत्ता,प्रखर तेज आणि वाणीवर प्रभुत्व केवळ वाचनानेच शक्य असल्याचे फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी सांगितले.
वाचनाने अनेक प्रश्नांची गूढ समजते.किंबहुना प्रत्येक गोष्टीची साध्यर्म कळते.तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचन संस्कृती संवर्धनासाठी व जोपासण्यासाठी नो गॅझेट डे,निरंतन वाचन,पुस्तक भेट,ऑनलाईन ई बुक्स चे वाचन इ.अनेकविध उपक्रमांचे आयोजन ऑनलाईन वेबिनार द्वारे संकुलात करण्यात आले होते.
समर्थ संकुलात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल प्रा.गणेश नवले यांनी ऑनलाईन वाचन स्पर्धा,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा इ.कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...