Skip to main content

हायवा ट्रक आणि पिकअपचा अपघात,पिकअपचा चालक जागेवर ठार,अपघात स्थळावरुन हायवाट्रकचा चालक पसार

बेल्हे (जुन्नरवार्ता सुधाकर सैद )
 अहमदनगर-कल्याण महामार्गावर बेल्हे येथील बाह्यवळण चौकात पिकअप व हायवा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला असून ही घटना मंगळवारी ( दि १९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाली आहे.
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की आळेफाटा बाजूकडून पारनेरकडे जाणारा राख भरलेला हायवा ट्रक ( एमएच-१५-जीव्ही-३६६०) हा पारनेर या ठिकाणी जाण्यासाठी बेल्हे गावाजवळ असलेल्या बाह्यवळण चौकातून पारनेर या ठिकाणी जाण्यासाठी वळत असतानाच नगरकडून आळेफाट्याकडे जाणाऱ्या पिकअपची (एमएच-१६सीसी-६९१९) आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये पिकअप चालक राहूल गोपीनाथ रायकर ( वय ३५ वर्ष राहणार पारगाव ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर) याचा जागीच मृत्यू  झाला असून घटना घडल्यानंतर हायवा ट्रकचालक गाडी सोडून पसार झाला असून  या घटनेची नोंद आळेफाटा पोलिस ठाण्यात झाली असून या प्रकरणी हायवा ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र पवार करत आहेत

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...