बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) शिरूर येथील युवा अभियंता आदित्य चोपडा यांचा मृत्यूच्या चौकशी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आळेफाटा (जुन्नर) येथील जैन श्रावक संघाने पत्र पाठवले आहे. याप्रकणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली असून निवेदनाची प्रत आळेफाटा पोलिसांना शुक्रवारी (१ ऑक्टोबर) देण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आणि व्यवसायानिमित्त शिरूर येथे स्थायिक झालेल्या युवा अभियंता आदित्य चोपडा यांचा मृतदेह नारायण गव्हाण येथील महामार्गालगतच्या विहिरीत २९ सप्टेंबर दुपारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत समाजमाध्यमावर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत,त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करून चोपडा कुटुंबियांना योग्य न्याय द्यावा तसेच तपासामध्ये दिरंगाई व दिशाभूल केल्याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकावे यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशा मागणी आळेफाटा येथील जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांच्यासह पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment