बेल्हे(वार्ताहर) राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी "मिशन युवा स्वास्थ्य अभियान" २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत कोव्हीड १९ लसीकरण शिबिराचे आयोजन बेल्हे (बांगरवाडी) येथील समर्थ शैक्षणिक संकुलात करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य,विभागप्रमुख व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
युवकांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष समर्थ संकुलात उभारलेले आहेत.लस आणि लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष थोरात तसेच आरोग्य सेवक उत्तम लबडे, उषा आहेर,जगदीश ताजवे यांचे सहकार्य लाभले.यावेळी संकुलातील अभियांत्रिकी,एम बी ए, फार्मसी,बी सी एस,पॉलिटेक्निक या विभागातील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे पहिला डोस व दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले.
Comments
Post a Comment