बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने 'फार्मासिस्ट डे' निमित्त २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत तीन दिवसीय "ऑनलाईन चरक सुश्रुत व्याख्यानमालेचे " आयोजन करण्यात आले होते.सदर व्याख्यानमाला गेली ३ वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात असल्याचे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी सांगितले.
व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प हैदराबाद येथील पॅरेक्सएल कंपनीमध्ये मेडिकल सेफ्टी रायटर म्हणून कार्यरत असणारे अभिनव गड्डम यांनी गुंफले.त्यांनी "स्कोप ऑफ फार्माकोव्हिजिलन्स इन फार्मा सेक्टर " या विषयावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.बी फार्मसी नंतर विद्यार्थ्यांना फार्माकोविजिलन्स मध्ये असणाऱ्या नोकरीच्या संधी,फार्माकोविजिलन्स मध्ये नोकरी करण्यासाठी प्रवेश कसा मिळवावा व त्यासाठी काय तयारी करावी लागते याबाबत सविस्तर माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी पुणे येथील मार्केटिंग सेफ्टी असोसिएटेड विथ लॅबक्रॉप ड्रग डेव्हलपमेंट या ठिकाणी टीम मॅनेजर पदी काम करणारे आनंद अट्टल यांनी विद्यार्थ्यांना "अ जर्नी ऑफ ड्रग फ्रॉम डेव्हलपमेंट टू मार्केट:स्कोप ऑफ फार्मसी " याबद्दल ऑनलाईन माहिती दिली.मॉलेक्युलर डिस्कवरी व तो मॉलेक्युल मार्केट मध्ये येईपर्यंत त्यावर होणाऱ्या प्रक्रिया म्हणजेच क्लिनिकल ट्रायल्स व फार्मसी चा त्या मध्ये असणारा वाटा किती महत्वाचा असतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी सायंटिफिक असिस्टन्ट म्हणून इंडियन फार्माकोपिया कमिशन, गाझियाबाद या ठिकाणी कार्यरत असलेले अरविंद कुमार शर्मा यांनी "रोल ऑफ फार्माकोपिया कमिशन इन सेटिंग फार्माकोपिया स्टॅंडर्ड " या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले.
इंडियन फार्माकोपिया ची विस्तारित संरचना व त्यात फार्मासिस्ट चे असलेले योगदान यासंदर्भात माहिती दिली.इंडियन फार्माकोपिया बनवण्यात असलेल्या फार्मसी स्टुडंट्स ला संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करत त्यासाठी प्रवेश अर्ज तसेच त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. इंडियन फार्माकोपिया डेव्हलपमेंट मध्ये असलेल्या नोकरी च्या संधी आणि त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याची पद्धत यावेळी विद्यार्थ्यांना समजून सांगितली.
सदर व्याख्यानमाला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विभागप्रमुख प्रा.सचिन दातखिळे,प्रा.अजय शेळके,प्रा.अजय भागवत,प्रा.प्रशांत घोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रद्धा खळदकर,प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुभाष कुंभार यांनी तर आभार प्रा.मिनाज इनामदार यांनी केले.
Comments
Post a Comment