बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन घोडे व ईतर पाच जणांवर आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबतची आळेफाटा पोलीस सूत्रांकडून समजलेली माहीती अशी की शरद दत्तात्रय पिंगट (रा.बेल्हे) हे आपल्या शेतात काम करत होते,तसेच त्यांच्या लगतच गजानन घोडे याची शेतजमीन आहे. पुर्वीपासुन त्यांचे याच जमिनीच्या हद्दीवरून आपापसात किरकोळ वादही झाले होते मात्र ते एवढे टोकाला गेले नव्हते मात्र यावेळेस गजानन घोडे यांनी याच वादाच्या कारणावरून वाद असलेल्या जागेत मुरूम टाकल्याने हा वाद आणखीच चिघळला व पर्यायाने या वादाचा परीणाम हाणामारीत झाला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य गजानन घोडे,निखील घोडे,तेजस घोडे,विलास पिंगट( रा.बेल्हे, ता.जुन्नर)अविनाश हाडवळे,पप्पू औटी(रा.राजुरी,ता.जुन्नर पुर्ण नाव माहीत नाही) या सहा जणांनी शरद दत्तात्रय पिंगट याना जबर मारहाण केली असून या मारहाणीत शरद पिंगट हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले आहे. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधीत सहा आरोपी विरूद्ध भा.द.वि. 326/324 /141/ 142/ 149 / 504 /506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास गोसावी हे पुढील तपास करत आहेत.कृषी उत्पन्न बाजारसमितीचे माजी संचालक गजानन घोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment