बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार बेल्हे आवारात दर सोमवारी जनावरांचा मोठा बाजार भरला जातो,अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी जनावरे खरेदीसाठी येथे येत असतात. दर सोमवारी भरणाऱ्या या बाजारात लाखोंची उलाढाल होत असून मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते. सुमारे पाच महिन्यांच्या बंदनंतर जनावरांचा बाजार चालू करण्यात आला परंतु जनावरांना लंपी व लाळ्या खुरकत रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला व हा रोग संसर्गजन्य असून, त्याचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील जनावरांचे सर्व बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचे आदेश काढले असल्याने भाद्रपद पोळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यापाऱ्यांनी जास्त बैलांची खरेदी केली होती परंतु बैलबाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांची सर्व खरेदी अंगावर पडली असून या बंदमुळे बाजारसमितीचेही जवळपास ७०/८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते तसेच बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलसजावटीच्या साहित्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसला असून बैलबाजारात पूर्णणे शुकशुकाट जाणवत होता.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment