बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल मार्फत नुकत्याच आयोजित केलेल्या "प्लेसमेंट ड्राईव्ह २०२१" मध्ये तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील ८ विद्यार्थ्यांची एल अँड टी डिफेन्स या तळेगाव दाभाडे येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये पॉलिटेक्निक मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील किरण शेळके,श्रिकांत पॉल,भाग्यश्री शेंडकर,ऋषिकेश टेमगिरे,साहिल वाघ,गणेश शेटे,विकास आव्हाड व अमोल लाग या ८ विद्यार्थ्यांची सदर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड करण्यात आल्याची माहिती कंपनीचे HR चे असिस्टंट मॅनेजर विलास पवार व ऑफिसर बालाजी कवथले यांनी दिली.
संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,सामान्य ज्ञान,विषयाबाबतचे तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये केलेला आहे असे यावेळी कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर गोरखनाथ बाळशिराम औटी म्हणाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य अनिल कपिले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित एल अँड टी कंपनी चे
असिस्टंट जनरल मॅनेजर गोरखनाथ बाळशिरम औटी,
HR चे असिस्टंट मॅनेजर विलास पवार,ऑफिसर बालाजी कवथले,
Comments
Post a Comment