बेल्हे(वार्ताहर) गुंजाळवाडी(ता.जुन्नर) येथे कल्याण-अहमदनगर महामार्गावरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या डोक्यात लोखंडी राॅडने मारुन जखमी केल्याप्रकरणी तिघाजणांवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबतची आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी बेल्हे राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे (रा.बेल्हे ता.जुन्नर, जि.पुणे) हे शुक्रवारी(दि.१९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आळेफाटा येथून आपल्या दुचाकीवरुन बेल्हे गावाकडे जात असताना राजुरी गावच्या पुढे गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागून येणारे त्यांचे चुलतभाऊ साहेबराव चाटे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी राॅडने मारहाण करुन गंभीर जखमी केले असून या प्रकरणी साहेबराव धनंजय चाटे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना कल्याण-अहमदनगर महामार्गावर असणाऱ्या मंगल कार्यालयासमोर गुंजाळवाडी गावच्या हद्दीत घडली असून पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित पोळ हे करत आहेत.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment