बेल्हे (वार्ताहर)मंगरुळ(ता.जुन्नर) येथील गणेशनगर भागात ऊस तोडणी चालू असताना शुक्रवार (दि.२६) रोजी एका शेतात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली असून त्या बिबट्याच्या पिल्लांना त्यांच्या आईपर्यंत पोचवण्याची कार्यवाही वनविभागाने केली आहे.याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की मंगरुळ (ता. जुन्नर) येथील गणेशनगर भागात चिमाजी बाबुराव येवले यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना दुपारी चार वाजता दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली असता ग्रामस्थांनी सदर घटना तात्काळ वनविभागाला कळवली. या पिल्लांची माहिती मिळताच ओतूरचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार बेल्हे वनपाल आर.यू .वीर व पारगाव तर्फे आळे वनरक्षक राजू गाढवे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या पिल्लांची डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली असता एक अडीच महिने व दुसरे नऊ महिन्याचे नर व मादी अशी दोन पिल्ले होती.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...
Comments
Post a Comment