Skip to main content

क्रिकेट स्पर्धेला राष्ट्रवादीच्या एका गटाची दांडी, दिवाळीतच फुटले गटबाजीचे फटाके.

बेल्हे(वार्ताहर) जुन्नरचे कर्तव्यदक्ष युवा आमदार अतुल बेनके  यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक ९/११/२९२१ रोजी संध्याकाळी  पाच वाजता बेल्हे येथे झालेल्या जुन्नर तालुका प्रिमिअर क्रिकेट लीगच्या आमदार चषक स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादीच्या गटतटाचे राजकारण पाहावयास मिळाले.पुणे, अहमदनगर,नाशिक या व ईतरही अनेक ठिकाणाहून क्रिकेट रसिकांनी हजेरी लावली परंतु या गटातील जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समर्थकांनी दस्तुखुद्द आमदारांच्या कार्यक्रमाला पाठ दाखविली,तसेच यावेळी झालेल्या स्पर्धेच्या कार्यक्रम पत्रिकेत दुसऱ्या गटांची नावे नसल्याने ऐन दिवाळीत राष्ट्रवादीच्या दुफळीचे फटाके ऐकावयास मिळाले असून त्याचा परिणाम आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचे काटे गटबाजीमुळे बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच या गटबाजीचा फटका विद्यमान आमदारांनाही बसणार असल्याची  चर्चा जिल्हापरिषद गटात ऐकायला येत आहे.गेल्या आठ ते दहा वर्षापासून निमगावसावा (ता.जुन्नर ) येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात भरविल्या जात होत्या परंतु यावर्षी माशी कुठे शिंकली कोण जाणे स्पर्धा रद्द झाल्या व अगदी थोड्याच अवधीत बेल्हे येथील आमदारांचे खंदे समर्थक अतुल भांबेरे व बेल्हेचे सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी आमदार चषक स्पर्धा यशस्वी करुन दाखवली व मिळालेला प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या गर्दीमुळे भांबेरे यांच्या आशेला जिल्हा परिषदेचे धुमारे फुटू लागले आहेत व यातुनच अतुल भांबेरे यांच्या राजकीय कारकिर्दीस चारचांद लागणार असल्याचे दिसून आले परंतु जिल्हा परिषद गटातील सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची मोठी तारेवरची कसरत भांबेरे यांना करावी लागणार आहे तसेच समर्थचे राजकारणही अजून गुलदस्त्यात असून त्यांना माननारा एक मोठा वर्ग या गटात असून आरक्षणानंतरच समर्थवाले आपला पत्ता उघड करणार असल्याचे समजते आणि नव्यानेच भाजपात गेलेल्या आशा समर्थकांनीही या गटात ब-यापैकी हातपाय पसरल्याने येणारी जिल्हा परिषद निवडणूक कोणत्याही पक्षाला सहजसाध्य होणार नसून शिवसेना,राष्ट्रवादी यामध्येच खरी लढत होणार असून नव्यानेच तालुक्यात हातपाय पसरलेल्या कमळाबाईंची गोळाबेरीज किती होते यावरच ईतर दोघांची परिक्षा अवलंबून आहे,राष्ट्रवादीच्या दोन गटांना विद्यमान आमदारांनी येनकेन प्रकारे चुचकारुन सावरुन घेतले नाही  तर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे गटबाजीमुळे बिघडले जातील व जिल्हा परिषद गटात परत समर्थचा बोलबाला होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...