Skip to main content

गुळूंचवाडी येथील तरुणाने केली आत्महत्या

बेल्हे(वार्ताहर)   गुळूंचवाडी(ता.जुन्नर)येथील एका ४२ वर्षीय व्यक्तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.बाबाजी अर्जुन गुंजाळ(वय ४२वर्ष)असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी शुक्रवारी ( दि २६) राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही याबाबतची फिर्याद मयत बाबाजीचे लहान भाऊ दत्तात्रय अर्जुन गुंजाळ यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली असून या फिर्यादीवरुन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंकलेश्वर भोसले हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची पुणे येथ

शेळके कुटूंबाने जपला ऐक्याचा वसा आणि वारसा

बेल्हे(वार्ताहर)  समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष वसंतराव शेळके,राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊली शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व शेळके परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व गावातील सर्व प्रमुख संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रत्येकवर्षी दिवाळीच्या सणाला सर्व मुस्लिम बांधवांना बोलावून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून राजुरी या गावाला एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक आहे व ती जपण्याचा,जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदू मुस्लिम या बांधवांना एकत्रित घेऊन या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शेळके कुटुंबियांमार्फत दरवर्षी केला जातो. युवा नेतृत्व वल्लभ शेळके यांच्या पुढाकाराने साजरा होत असलेला दिवाळी फराळाचा कार्यक्रम म्हणजे खमंग विचारांचा खरपुस नजराणा असून खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम बांधवांचे पूर्वापारपासूनचे एकोप्याचे दर्शन घडवतो तसेच राजुरी गावच्या जडण-घडणी मध्ये श

ऊस ट्रॕक्टर ट्राॕलीला चारचाकीची मागून धडक एक ठार दोन गंभीर

बेल्हे(वार्ताहर) कल्याण-अहमदनगर महामार्गावर गुळूंचवाडी गावच्या हद्दीत उसाच्या ट्रॉलीला इनोव्हा कारने पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असून हे सर्व जण नगरकडून आळेफाटा येथे जात असताना शुक्रवारी (दि.१९) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून संजय मारुती गगे( रा.नळवणे,ता.जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की कल्याण-अहमदनगर  महामार्गावर गुळंचवाडी शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच १६ केव्ही ६४८६ ) नंबर नसलेल्या व उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जात होता,त्याच दरम्यान भरधाव वेगाने आळेफाट्याकडे जाणारी इनोव्हा चारचाकी ( एमएच-१९-एपी-८०१०)ट्रॉलीच्या पाठीमागून जाऊन धडकली व जोरदार धडक बसल्याने इनोव्हा चारचाकीचे डाव्या बाजुचे जास्त नुकसान झाले असून धडक इतकी जोराची होती की इनोव्हामधील संजय मारुती गगे जागीच ठार झाले व उर्वरित दोन जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी द